जळगाव प्रतिनिधी । भादली येथील 50 वर्षीय महिलेच्या पोटातून पाच किलोचा गोळा काढण्यात जिल्हा रूग्णालयातील वैदयकिय अधिकाऱ्यांना यश आले. याबाबत महिलेच्या कुटुंबियांनी वैदयकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले.
याबाबत माहिती अशी की, कुसुमबाई जगन्नाथ सपकाळे (वय-50), रा. भादली खुर्द ता. जळगाव यांच्या पोटात आठवड्यापुर्वी दुखत होते. त्यांनी खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांनी प्राथमोपचार केला मात्र काही फरक पडला नाही. त्यांनी पोटाची सोनोग्राफी करण्याची सल्ला दिला. त्यानुसार कुसुमबाई सपकाळे यांनी पोटाची सोनोग्राफी करण्यात आले. त्यात त्यांच्या पोटात पाच किलोची गाठ असल्याचे आढळले. लगेचच त्यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय अहिरे आणि नितीन चौधरी यांच्या संपर्क साधला. जिल्हा रूग्णालया दाखल केल्यानंतर आज त्यांच्यावर ऑपरेशन करण्यात आले. अडीच तासाच्या प्रयत्नानंतर वैद्यकिय अधिकाऱ्यांनी महिलेच्या पोटातून पाच किलोचा मासंचा गोळा काढला. हा गोळा 22 बाय 18 इंचचा होता. याकामी वैदयकिय अधिकारी डॉ.सुशांत सुपे, डॉ. संगीता गावीत, डॉ. किरण सोनवणे यांच्या टिमचे काम पाहिले.