पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा शहरातील भुयारी मार्गालगत नाला असुन या नाल्यावर काही बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमण केले असुन यासंदर्भात नगरसेवक भुषण वाघ यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु आंदोलन होण्यापुर्वीच आमदार किशोर पाटील यांचा व्यावसायिक व नगरपालिका मुख्याधिकारी यांना फोन येताच सदरचे आंदोलन एक ते दिड महिन्याचा कालावधी मागुन मागे घेण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील रेल्वे भुयारी मार्गालगत शेतकरी सहकारी संघा जवळ ब्रिटीशकालीन नाला असून या नाल्यावर शहरातील काही व्यावसायिकांनी बेकायदेशीर बांधकाम केले आहे. भविष्यात नाल्यात व परिसरात पाणी साचल्यास परिसरातील नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते तथा नगरसेवक भुषण वाघ यांच्या निदर्शनास येताच भुषण वाघ यांनी आज आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. यासंदर्भात आमदार किशोर पाटील यांनी संबंधीत व्यावसायिक व नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करुन सदरचे अतिक्रमणाबाबत दोन्ही पक्षांच्या बाजु जानुन घेवुन तोडगा काढवा अशा सुचना दिल्या. यावर संबंधित व्यावसायिकाने एक ते दिड महिन्याचा कालावधी मागीतला असता आंदोलनकर्ते नगरसेवक भुषण वाघ व नगरपालिका मुख्याधिकारी यांचे एकमत झाल्याने सदरच्या अतिक्रमणास एक ते दिड महिन्याचा कालावधी सर्वानुमते देण्यात आला आहे. यावेळी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, नगरसेवक भुषण वाघ, नगरसेवक विकास पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच सुरक्षिततेसाठी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1117559002069311