व्‍हीटीपी समस्यांबाबत कौशल्य विकास मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

3f7178e7 92de 4913 90ca 372595414ae5

भुसावळ, प्रतिनिधी | मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात कौशल्य विकास मंत्र्यांशी आमदार सुरेश भोळे जळगाव व आमदार संजय सावकारे भुसावळ यांच्या मध्यस्थीने व्हीटीपी बांधव यांच्या व्हीटीपी समस्या, तक्रारी व इतर गोष्टींबाबत बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

 

या तक्रारींबाबत कौशल्य विकास मंत्र्यांनी यशस्वी प्रतिसाद देत काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यामध्ये आग्रही निमजाई फाउंडेशन, श्रीहरी एज्युकेशन सोसायटी जळगाव, अनुज ट्रेनिंग सेंटर भुसावळ यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निमजाई फाऊंडेशनचे भूषण बाक्षे, शीतल पाटील, दीपक जावळे, श्रीहरी एज्युकेशन सोसायटी जळगावच्या ज्योती महाजन,अनुज ट्रेनिंग सेंटर भुसावळच्या अनिता आंबेकर हे उपस्थित होते.

Protected Content