जळगाव प्रतिनिधी | पॉलिटेक्नीकला प्रवेश घेण्यासाठी ऑप्शन अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून गोदावरी तंत्रनिकेतनमध्ये अद्ययावत सुविधा आहे. येथे कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल असून या कॉलेजात प्रवेश घेण्यासाठी पर्याय निवडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, तंत्रनिकेतनमधील पदविका अर्थात पॉलिटेक्नीकच्या डिप्लोमा कोसेससाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू असून पहिली फेरी आटोपली आहे. दुसर्या फेरीसाठी दिनांक २५ ते २८ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑप्शन फॉर्म भरणे सुरू आहे. ज्यांना पहिल्या फेरीत सीट अलॉट झाली नाही व ज्यांनी बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट केले आहे त्यांनी २५ ते २८ तारखेच्या दरम्यान ऑप्शन फॉर्म भरणे आवश्यक आहे.
ऑप्शन फॉर्म भरतांना शेवटचे ऑप्शन हे आपल्या आधीच्या राऊंड मधील आपणास अलॉट झालेले कॉलेज व ब्रांच हे शेवटचे असणार आहे. नवीन भरलेले अथवा रिपीट भरलेले ऑप्शन्स हे वरचे असतील जर सेकंड राउंड च्या अलॉटमेंट मध्ये आपल्याला शेवटचे सोडून वरचे ऑप्शन पैकी सीट अलॉट झाली तर त्यात तर आधीच्या राऊंड मधील मिळालेली झालेली सीट निघून जाईल. दरम्यान, दिनांक ३० सप्टेंबरला वाटप केलेली संस्था आणि पाठ्यक्रम दर्शविणारे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) दुसर्या फेरी साठी तात्पुरते जागा वाटप प्रदर्शित केली जाईल. सीट ऍक्सेप्टन्स दिनांक १ ऑक्टोबर २०२१ ते ५ ऑक्टोबर २०२१ व अलॉट झालेल्या कॉलेजला रिपोर्टिंग दिनांक १ ऑक्टोबर २०२१ ते ६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत असेल.
दरम्यान, गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना अतिशय अद्ययावत अशा सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. येथे अतिशय अनुभवी प्राध्यापक वृंद असून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाते. या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल ह्या तीन ब्रांच असून ज्यांना महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी प्रोफेसर. दीपक झांबरे , प्रोफेसर. चेतन विसपुते , प्रोफेसर. कैलास माखिजा यांच्याशी संपर्क करावा. इच्छुक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी एकदा कॉलेज कॅम्पस बघण्यासाठी प्रत्यक्ष व्हिजीट दिल्यास त्यांना येथील दर्जेदार सुविधा प्रत्यक्ष अनुभवता येतील असे संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुक विद्यार्थ्यानी खालील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१) ७८८८२५१२२५ २)९०६७३८१८९८ ३)७०२०३९९९०९