Home Cities जळगाव जळगाव लोकसभेसाठी दुपारी २ वाजेपर्यंत २९.९० तर रावेरमध्ये ३३.२० टक्के मतदान

जळगाव लोकसभेसाठी दुपारी २ वाजेपर्यंत २९.९० तर रावेरमध्ये ३३.२० टक्के मतदान


VoterTurnout 01
 

जळगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने लॉन्च केलेले ‘Voter Turnout’ या अॅपवर जिल्ह्यातील दोन्ही संघाची मतदानाची रिअल टाईम आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार जळगाव लोकसभेसाठी दुपारी ३ वाजेपर्यंत २९.३० तर रावेरमध्ये ३३.२० टक्के मतदान झाले आहे. या अॅपवर दोन्ही लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघनिहाय देखील आकडेवारी अपडेट होत आहे.

 

‘Voter Turnout’ या अॅपच्या माध्यमातून देशातील नागरिक राज्यनिहाय आणि मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी तात्काळ पाहू शकणार आहे. याशिवाय नागरिकांना त्यांच्या क्षेत्रातील मतदान केंद्रांसंदर्भातली माहितीसुद्धा या अॅपवर पाहता येतेय. या जळगाव लोकसभेसाठी दुपारी दोन वाजेपर्यंत २९.३० तर रावेरमध्ये ….. टक्के मतदान झाल्याचे ‘Voter Turnout’ या अॅपवर दाखवत आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातील जळगाव शहर विधानसभा मतदार संघात २२.०१,जळगाव ग्रामीण ३४.१७, अमळनेर ३१.०७,एरंडोल ३४.००,पाचोरा २६.८०, चाळीसगावमध्ये ३३.५०टक्के मतदान झाले आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदार संघात ३४.२७, रावेर ३८.२५, भुसावळ३०.३५,जामनेर३२.६०, मुक्ताईनगर २६.१०, मलकापूर ३८.०२ टक्के मतदान झालेले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound