रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील राजकारणी व लोकप्रतिनिधींनी यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर साधेपणाने दिवाळी साजरी केली.
तालुक्यात सुख शांती आणि समृद्धीसाठी आमदार शिरीष चौधरी यांनी पहीला दिवा त्यांच्या खिरोदा येथील घरा समोर लावून दिवाळीला सुरुवात केली. तर जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांनी तांदलवाडीत साध्या पध्दतीने कुटुंबा सोबत दिवाळी साजरी केली. भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके यांनी रसलपुरमध्ये राम मंदिरात पहीला दिवा लावून दिवाळी साजरी केली. तर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन यांनी रावेरात अंबिका व्यायाम शाळामध्ये पहीला दिवा लावून दिवाळी साजरी केली.
डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, प्रांतधिकारी अशोक कडलग, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी पहीला दिवा आपल्या राहत्या घरी लावून दिवाळी साजरी केली. डॉ. संदीप पाटील. डॉ डिंगबर पाटील व डॉ. प्रविण चौधरी यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये पहीला दिवा लावून गरजुना मिठाई वाटप करत दिवाळी साजरी केली. व्यावसायिक वरुण अग्रवाल यांनी पहीला दिवा हनुमान मंदीरात लावून दिवाळीला सुरुवात केली. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी पहीला दिवा रावेर पोलिस स्टेशला लावून दिवाळी साजरी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष निळकंठ चौधरी यांनी खिरवड येथे पहीला दिवा लावून दिवाळी साजरी केली. सर्वांनी कोरोनाचे संकट लवकर जावे तसेच सर्वांना सुख समृद्धिचे दिवस येण्यासाठी प्रार्थना केली.