जळगाव (प्रतिनिधी)। महाराष्ट्रात पोलिओ लसीकरण मोहीम आज राबविण्यात आली. राज्यातील सुमारे १ कोटी २२ लाख बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सांयकाळी पाच वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जळगाव शहरासह प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोलीओ डोस देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
शून्य ते पाच वयोगटातील सर्व मुलामुलींना पोलिओचा डोस द्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. दरवर्षी वर्षातून दोनदा पोलिओची विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्हा रूग्णालयात सकाळपासून पोलीओ डोस देण्याचे काम सुरू आहे.