पत्नीच्या छळप्रकरणी पोलिस उपनिरिक्षकास अटकपूर्व जामीन मंजूर

धरणगाव/जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पत्नीच्या छळप्रकरणी पोलिस उपनिरिक्षक पदावर असलेल्या शरद सैंदाणे यांना नुकताच न्यायालयाने अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील मुळ रहिवासी असलेले व सध्या गोंदिया येथे उपनिरिक्षक पदावर कार्यरत असलेले शरद सैंदाणे व त्यांचे नातलग छगन महादू सैंदाणे, आशा हर्षल सैंदाणे, सुनिल गोपींचंद सोनवणे, रेखा सुनील कोळी, सचिन शेनफडू सैंदाणे, मयुर सुनील कोळी यांच्या विरुध्द शरद सैंदाणे यांच्या पत्नीने सीआरपीसी कलम ३२३,४०६,४१७,४२०,४९८-अ,५०४,५०६ भारतीय दंड संहितेच्या कलम ३४ नुसाार नोंदवण्यात आली होती.

सदर तक्रारीत पत्नीस त्रास देणे, न सांगता घरातून निघून जाणे, नातलग रेखा सोनवणे आणि सुनील सोनवणे यांच्या मार्फत पत्नीस सुरत येथे गर्भलिंग चाचणी करण्यास भाग पाडणे, तसेच पत्नीला झालेले मुल मृत भावाच्या पत्नीस दत्तक देण्यासाठी दबाव आणणे अशी तक्रार होती.

सदर तक्रार तालुका पोलिस स्टेशन २५७/२०२४ नुसार नोदवण्यात आली होती. सदर तक्रारी वरुन शरद सैंदाणे यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात दाद मागीतली होती. अर्जदार/आरोपी (1) शरद छगन सैंदाणे (2) छगन महादू सैंदाणे (3) आशा हर्षल सैंदाणे (4) सुनील गोपीचंद कोळी (सोनवणे) रेखा सुनील कोळी (सोनवणे) (6) सचिन शेंफडू सैंदाणे आणि (7) मयूर सुनील कोली (सोनवणे) यांना तपास अधिकाऱ्याने जेव्हा आणि जेव्हा बोलावले जाईल तेव्हा ते संबंधित पोलिस स्टेशनमध्ये हजर राहतील आणि त्याला सहकार्य करतील. तसेच ते पुराव्यांशी छेडछाड करणार नाहीत किंवा माहिती देणाऱ्यावर प्रभाव टाकणार नाहीत. या अटीवर अटकपूर्व जामिन मंजूर करण्यात आला आहे.

Protected Content