Home क्राईम किन्ही गावातील जुगार अड्डयावर धाड

किन्ही गावातील जुगार अड्डयावर धाड

0
75


भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील किन्ही गावातील जुगार अड्डयावर तालुका पोलीस स्थानकाच्या पथकाने धाड टाकून नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना किन्ही येथे जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. या अनुषंगाने पोलीस पथकाने किन्ही येथे रात्री एकच्या सुमारास धाड टाकली असता, सुनील किशन थनवर हा काही लोकांसह झन्ना-मन्ना नावाचा जुगारचा खेळ खेळतांना आढळून आले. येथे एकूण ९ इसम मिळून आले असून त्यांच्या विरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या आंगझडती मध्ये रोख रक्कम १८१००/- रूपये आणि तीन मोटर सायकल किंमत २,२८,१०० रु मुद्देमाल मिळून आला.

संबंधीत कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उप निरिक्षक गजानन करेवाड, पोहेकॉ विठ्ठल फुसे, सुनील चौधरी व राजेंद्र पवार यांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound