पाच गावठी दारूच्या अड्ड्यांवर पोलीसांचा छापा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा आढावा बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी अवैध दारु विक्रीविरुध्द अधिकाऱ्यांवर संताप केला होता. मंत्र्यांनी नाराजी तसेच संताप व्यक्त केल्यानंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव तालुका पोलिसांनी शुक्रवार, २८ जुलै रोजी वॉश आऊट मोहिम राबवित, जळगाव तालुक्यातील भोलाणे तसेच देऊलवाडे या दोन्ही गावात छापा टाकून एकूण पाच गावठी दारुच्या अ्ड्डयावर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण गावठी दारुसह ८२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने शुक्रवारी गावठी दारु अड्डयावर कारवाईची मोहिम राबविण्यात आली, यात वेगवेगळी पथके नियुक्त करण्यात आली होती. या एका पथकाने भोलाणे गावात छापा टाकून गावठी दारु विक्री करणाऱ्या तिघांवर कारवाई केली, यात ५२ हजार ७०० रुपयो कच्चे पक्के रसायन व ८५ लीटर ३ हजार ७०० रुपयांची गावठी दारु असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच भूषण दशरथ कोळी, आकाश नितीन कोळी व सागर ऊर्फ राहूल अमृत कोळी सर्व रा. भोलाणे या तिघांविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दुसरी कारवाई पथकाने देऊळवाडे या गावात केली, या २४ हजार २०० रुपयांचे रसायन व ५५ लीटर २ हजार २०० रुपयांची गावठी दारु असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोरख हरी सोनवणे व अनिल एकनाथ सोनवणे या दोघांविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आहे.  अशाप्रकारे एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तालुका पोलिसांच्या कारवाईने गावठी दारु विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Protected Content