पहूर,ता.जामनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l तालुक्यातील भारुड खेडा येथे गावठी हातभट्टी वर पहूर पोलिसांनी छापा टाकून बत्तीस हजार किमतीचे रसायन जागीच नष्ट करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील भारुडखेडा गाव येथे गावठी हातभट्टी विषयी गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार गावठी हातभट्टीवर पंचा समक्ष छापा घातला. याप्रसंगी मनोज हिम्मत गोसावी, आकाश जालम गोसावी, करण मुन्ना गोसावी, तनु संजय गोसावी हे त्यांचे राहते घरालगत गावठी हातभट्टी तयार करत असल्याचे आढळून आले. सदर ठिकाणी 32000 रुपये किमतीचे 1600 लिटर कच्चे रसायन जागीच नाश करण्यात आले. याबाबत मुंबई दारूबंदी अधिनियम अन्वये वरील आरोपींविरोधात पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते ,पोलीस नाईक अमोल पाटील ,पोलीस वैभव देशमुख, प्रवीण देशमुख, मनोज धनगर, हेमंत सोनवणे यांनी कारवाई केली आहे. या धडक कारवाईमुळे पहूर पोलिसांचे कौतुक होत आहे.