Home क्राईम जळगावात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई:

जळगावात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई:

0
234

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या योगेश्वर नगर परिसरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या एका कुंटणखान्याचा पोलिसांनी सोमवारी रात्री पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी कुंटणखाना चालवणाऱ्या मालकासह दोन महिलांना ताब्यात घेतले असून, यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश्वर नगर भागात एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाईची रणनीती आखली. खात्री पटल्यानंतर पथकाने या ठिकाणी अचानक छापा टाकला.

या कारवाई दरम्यान, वेश्याव्यवसाय चालवणारा मालक आणि दोन महिला संशयास्पद रित्या मिळून आल्या. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या तिघांनाही ताब्यात घेतले. भरवस्तीत अशा प्रकारे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता, मात्र पोलिसांच्या या कारवाईनंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवींद्र मोतीराया, पोलीस कॉन्स्टेबल अवेश शेख, अमोल ठाकूर, प्रणय पवार आणि महिला पोलीस कर्मचारी स्मिता पाटील यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.


Protected Content

Play sound