यावल प्रतिनिधी । अयोध्या येथे होणाऱ्या रामजन्मभूमी शिलान्यास कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री यावल शहरात पोलीस दलातर्फे पथसंचलन करण्यात आले.
यावल तालुक्यात व परिसरात पुर्वसंध्येला जातीय सलोखा, धार्मीक बंधुता वाढीस लागावी या दृष्टीकोणातून पोलीस प्रशासनाच्या वतीने यावलचे पोलीस निरिक्षक अरुण धनवडे आणि त्यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी सर्वत्र गस्त घातली होती. नागरीकांना कायदाचे पालन करून शांतता प्रस्थापित करण्याचे तालुक्यातील साकळी, किनगाव, दहिगाव यावल शहर यासह संवेदनशील परिसरात व गाव परिसरात पोलीस प्रशासनाच्या वतीने पथसंचलन केले. यात राष्ट्रीय एकता कायम राखावी या करीता सर्व नागरीकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे जाहीर आवाहन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी केले आहे.