Home Cities यावल उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस पाटील यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस पाटील यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील गिरडगाव येथील पोलिस पाटील व गाव कामगार पोलिस पाटील संघाचे जिल्हा कार्यअध्यक्ष अशोक रघुनाथ पाटील यांना उत्कृष्ठ पोलीस पाटील म्हणून कार्ये केल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.

देशाच्या ७८ व्या स्वातंत्रदिन १५ आँगस्ट रोजी नियोजन भवन जिल्हाअधिकारी कार्यालय जळगाव येथे आयोजीत या कार्येक्रमास गिरडगावच्या माजी सरपंच व अशोक पाटील यांच्या पत्नि सुरेखा पाटील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल किनगावचे अध्यक्ष विजयकुमार देवचंद पाटील, उपाध्यक्षा शैलेजाताई विजयकुमार पाटील, जळगाव येथील इंद्रदेव योगा सेंटरचे अध्यक्ष इंद्रराव पाटील, गावकामगार पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे, भागवत पाटील, चुंचाळे येथील पोलीस पाटील, गणेश साहेबराव पाटील इ.सह जिल्ह्यातील मान्यवर या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थीत होते. अशोक पाटील यांना उत्कृष्ठ पोलीस पाटील हा पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरावरून स्वागत करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound