यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अकलुद येथील पोलीस पाटील किरण वानखेडे याने तहसील कार्यालयात दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
यावल पोलिस पाटील किरण वानखेडे याने गेल्या सोमवारी १५ मार्च रोजी दुपारी 1.45 सुमारास सोबत असलेल्या एका दारूड्या व्यक्तीसह येथील तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार यांचे दालनात दारुच्या नशेत गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिस पाटील किरण वानखेडे यांचेविरूध्द यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. दरम्यान या गुन्ह्यामुळे प्रांताधिकारी यांनी पोलीस पाटील किरण वानखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.