जळगाव, प्रतिनिधी | पोलीस जनतेची सेवा करीत असतात, त्यांना ताणतणावाना सामोरे जावे लागते. यातून त्यांना कोठेतरी विरंगुळा मिळावा यासाठी ‘फत्तेशिकस्त’चे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर व निर्माते अजय आरेकर यांच्या संकल्पनेतून पोलिसांसाठी खास ‘शो’चे आयनॉक्स चित्रपटगृहात करण्यात आला असल्याची माहिती संदीप कुऱ्हाडे यांनी दिली.
शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणाऱ्या भारतातील पहिल्या सर्जिकल स्ट्राइकचा थरार ‘फत्तेशिकस्त’मध्ये दाखविण्यात आला आहे. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, उप विभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके व पोलीस उपस्थित होते. पोलिसांनी त्यांच्यासाठी आयोजित ‘फत्तेशिकस्त’च्या या विशेष ‘शो’चे स्वागत केले. त्यांनी चित्रपटगृहात‘फत्तेशिकस्त’च्या पोस्टर सोबत शेल्फी काढून आपला आनंद व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या शाहिस्त खानाची फजेतीचा पराक्रम केवळ पुस्तकातून वाचून किंवा एकून असतांना तो ७० एमएम पडद्यावर पाहण्याची संधी मिळाली आहे. नेहमीच दुसऱ्यांच्या सुरक्षेसाठी एकत्र येणारे पोलीस प्रथमच चित्रपट पाहण्यासाठी जवळपास एकत्र आले होते. यात १५० ते २०० पोलिसांचा समवेश होता.