चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या काळात स्वतः चा आरोग्य धोक्यात घालून सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पोलीस यंत्रणेला क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेडच्या वतीने शहरातील सिग्नल चौकात मोफत सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशा धैमान घातले आहे. या भयावह काळात पोलिस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत. आपल्या परिवारासह सर्वांच्या आरोग्याची काळजी घेत विनाकारण घराबाहेर पडू नका असा मोलाचा संदेश पोलिस प्रशासनाकडून वारंवार केला जात आहे. पुकारण्यात आलेल्या टाळेबंदीत पोलिसांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेडच्या वतीने शहरातील सिग्नल चौकात सॅनिटायझर व मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.
शहर पोलिस व वाहतूक शाखेचे कर्मचार्यांचा यात समावेश आहे. यावेळी पोलिस निरिक्षक विजयकूमार ठाकूरवाड, सहा पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, सहा पोलिस निरीक्षक विशाल टकले, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगिर, क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेडचे क्षेत्रिय अधिकारी शांताराम बारडोळे, विभागिय प्रमुख कारभारी मस्के, उपविभागिय अधिकारी योगेश वाल्हे, भगवान पाडूळसे, दिनेश मराठे व महादेव वाकोडे आदी उपस्थित होते.