जामनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील एका पाचवर्षीय बालिकेवर अत्याचार केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी भगवान शंकर करपे (वय ४५) याला पोलीसांनी अटक केली आहे. त्याला आज स्थानीक न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने १८ तारखेपर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मोयखेडा दिगर येथे पाच वर्षीय बालीकेला गुटख्याची पुडी आणायला सांगत भगवान करपे याने अत्याचार केला. चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी गुन्ह्याची नोंद गुरूवार रात्री उशीरा करण्यात आली होती. तेव्हापासुन संशयीत आरोपी भगवान करपे हा घटनास्थळावरून पसार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी सहाय्यक फौजदार जयसिंग राठोड, हे.कॉ. रमेश कुमावत, सचीन पाटील, अमोल वंजारी आदींच्या पथकाने शोधा-शोध करून अखेर जामनेर-बोदवड रस्त्यावरील वाडीकील्ला येथुन ताब्यात घेतले. विशेष म्हणजे संशयीत आरोपी हा कापुसवाडी ता. जामनेर येथील मुळ रहीवाशी असुन मोयखेडा दिगर येथील सासरवाडी असल्याने अनेक दिवसांपासुन तेथे रहायला आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप ईंगळे करीत आहे.