मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पो.नि. रामकृष्ण पवार यांनी पहिल्याच दिवशी परिसरातील अवैध धंद्यांवर धडक कारवाई करत गावठी हातभट्टी नष्ट करून विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवारी मुक्ताईनगर येथे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेले रामकृष्ण पवार यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन जणांवर कारवाई करून १ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला यात राजेश गोपालसिंग राजपूत एकवीरा हॉटेल याला ताब्यात घेत याच्याकडून ४ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली. दुसरी कडे राजेश विजय बोदडे रा. भिलवाड़ी मुक्ताईनगर याच्याकडून ९० हजार रुपये किमतीचे गावठी हातभट्टी दारुसाठी लागणारे रसायन, उकळते रसायन, गुळ मोह व दारू असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
मुक्ताईनगर च्या जनतेमध्ये आता हा प्रश्न उभा राहिला आहे. ही कारवाई फक्त काही दिवसांसाठी असेल की नेहमी साठी या अवैध धंद्यांवर आळा बसेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार, पोउनि निलेश सोळुंके, प्रशिक्षणार्थी पोउनि सुदाम काकडे, पो.कॉ. श्रावण जवरे, गणेश चौधरी, गणेश मनुरे, संतोष नागरे, संभाजी बिजागरे, कांतीलाल केदारे, देवसिंग तायडे, नितीन चौधरी, मंगल साळुंखे, होमगार्ड पथक देवेंद्र काटे, भूषण खडसे, अनिल शिंदे, गणेश उमाळे, निलेश घुले, मनोज पाटील, महिला होमगार्ड सुशिला पाटील, वंदना जाधव, सुनंदा भोई, रेखा सैतवाल यांच्या पथकाने ही कारवाई केली.