Home क्राईम भुसावळात मद्यधुंद पोलीसांकडून एकाला मारहाण

भुसावळात मद्यधुंद पोलीसांकडून एकाला मारहाण


Crime l 2

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यातील मद्यधुंद दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी येथील माजी उपनगराध्यक्षच्या मुलाला अश्लील भाषेत शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. जखमींना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, बाजारपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचारी योगेश माळी व शशी तायडे हे रेल्वे स्थानकाकडे दुचाकीने जात असताना त्यांच्या दुचाकीचा धक्का जिम चालक जुबेर खान नईम खान पठाण याला लागला. पठाणे याबाबत विचारणा केली असता साध्या गणवेशातील पोलिसांना जाब विचारण्याचा राग आल्याने त्यांनी जुबेर खान याला अश्लील भाषेत शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्याच्या नाका तोंडातून रक्त आल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालय दाखल केले. जखमी मुलगा हा माजी उपनगराध्यक्ष नईम खान पठाण यांचा मुलगा आहे. मद्या सेवन केलेल्या पोलिसांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात जुबेर खान पठाण याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार पुढील तपास करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound