ब्रेकिंग : उमर्टी गावाजवळ पोलिसांना मारहाण !

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आरोपीला ताब्यात घेण्यासाठी उमर्टी गावात गेलेल्या पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी बांधून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरील उमर्टी गाव हे अवैध बंदुका व गावठी कट्टयांच्या निर्मितीसाठी कुख्यात आहे. देशभरातील गुंड येथून शस्त्र खरेदी करत असतात. येथे अनेकदा पोलीस कारवाई होऊन देखील काहीही फरक पडलेला नाही.

दरम्यान, आज चोपडा पोलिसांचे पथक हे उमर्टी येथील एका आरोपीला अटक करण्यासाठी घेऊन गेले असता, स्थानिक ग्रामस्थांशी त्यांचा वाद झाला. याप्रसंगी त्ोथील लोकांनी पोलिसांना मारहाण केली. तर एका पोलीसाला बांधून ठेवण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच पोलीस अधिक्षकांनी तातडीने अतिरिक्त कुमक पाठवून रात्री या पोलिसांची सुटका केली. तर उमर्टी गावात पोलीसांनी पकडसत्र सुरू केले असून काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

उमर्टी गावात आधी देखील पोलिसांना धक्काबुक्कीचे प्रकार घडले आहेत. आता थेट पोलिसाला बांधून मारहाण केल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content