रावेर, प्रतिनिधी | यापुढे भारताकडून केव्हा पाकिस्तानवर केव्हा अणुबॉम्ब पडेल, हे सांगता येणार नाही म्हणून त्यांचे पंतप्रधान हिंदुस्थानच्या भीतीने जागतिक मदत मागत फिरत आहेत. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी कश्मीरमधील कलम ३७० हटवले असून लवकरच पाकव्याप्त कश्मीरसुध्दा भारताचा होणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रावेर येथील प्रचारसभेत सांगितले.
यावेळी व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, रावेर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार आमदार हरिभाऊ जावळे, मुक्ताईनगर मतदार संघाच्या उमेदवार रोहिणी खडसे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, जि.प. माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, राजेंद्र फडके, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद वायकोळे, उद्योजक श्रीराम पाटील, रावेर पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, पल्लवी महाजन, सुनील नेवे, हिरालाल चौधरी आदी उपस्थित होते.