Home क्राईम विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू


suside
 

जळगाव (प्रतिनिधी) भुसावळ तालुक्यातील बोरडे बु. येथील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने दि.१२ रोजी विष प्राशन केले होते. आज पहाटे शेतकऱ्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

 

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील बोरडे बु. येथील दिलीप अशोक गोपाळ (वय ३२) यांच्यावर नापीकी व यंदाच्या ओल्या दुष्काळामुळे कर्ज होते. याच तणावातून त्यांनी दि.१२ रोजी राहत्या घरात विष प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले होते. आज पहाटे ४:३० वाजेच्या सुमारास श्री.गोपाळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि पत्नी असा परिवार आहे.


Protected Content

Play sound