Home करियर केसीईच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी निमित्त काव्यवाचन

केसीईच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी निमित्त काव्यवाचन

0
31

जळगाव प्रतिनिधी । शहरातील केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आज कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी निमित्ताने ऑनलाइन काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या तसेच डॉ. स्वाती चव्हाण यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी मौलिक विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य अशोक राणे आणि उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयातील काही शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते मोनिका सोळंके यांनी ‘काया मातीत मातीत’ हे कविता भावपूर्ण सादर केले तसेच सायली पालीवाल, शुभांगी सोनवणे आणि इतर विद्यार्थ्यांनी बहिणाबाई चौधरींच्या भावपूर्ण कविता सादर केल्या. प्राचार्यांनी ‘मन वढाय वढाय’ ही कविता सादर करून बहिणाबाईंच्या कवितांचे जीवनात असलेले महत्त्व विशद केले. शेवटी डॉ. स्वाती चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.


Protected Content

Play sound