जळगाव (प्रतिनिधी)। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेत १५ मार्च २०१९ रोजी ‘Wikipedia Vector Graphics Localization’या विषयावर आधारित एक दिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन करीत आहे. प्रतिमेमधील इंग्रजी खुणांमुळे मराठी वाचकांना अडचण निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी एक चळवळ सुरू झाली आहे.
या कार्यशाळेमुळे, विकीपीडीया कम्यूनिटी गृपच्या माध्यमातून SVG Translation Campaign 2019 मध्ये सहभाग घेता येईल. सदर कार्यशाळेत भाषांतर कसे करावे हे शिकवण्यात येईल. कोणीही इच्छुक यात सहभागी होऊ शकतात. तरी इच्छुक विज्ञान-मराठी शिक्षक, निवृत्त शिक्षक, पत्रकार, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी यांना सहभाग नोंदणीसाठी आवाहन संगणकशास्त्र विभागातर्फे करण्यात आले आहे. सर्व इच्छुक व्यक्तींनी अधिक माहितीसाठी प्रा.डॉ.मनिष जोशी आणि डॉ. स्नेहलता शिरूडे (०२५७-२२५७४५३) यांच्याशी संपर्क करावा.
ऑनलाईन फार्म भरण्यासाठी लिंक : https://goo.gl/forms/gqEZIC9jLmk8YQMZ2 वर क्लिक करा.