Home राष्ट्रीय पंतप्रधानांच्या निवासस्थावरील बैठक संपली ; विदेश सचिव देणार माहिती

पंतप्रधानांच्या निवासस्थावरील बैठक संपली ; विदेश सचिव देणार माहिती


ajit doval us 150 1536910986
ajit doval us 150 1536910986

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय हवाई दलाने एअरस्ट्राईक केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सुरक्षा प्रमुख आणि नेत्यांची सुरु असलेली बैठक थोड्याच वेळापूर्वी संपली आहे. आता या हल्ल्यानंतर पुढील स्ट्रॅटेजीसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या 7 एलकेएम या निवासस्थानी ही बैठक झाली आहे. या बैठकीला सुषमा स्वराज, राजनाथसिंह, अरुण जेटली यांच्यासह तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित होते. भारताने या हल्ल्यानंतर पुढील योजना आखण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा झाली. भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी आज पंतप्रधानांची भेट घेऊन भारताने केलेल्या कारवाईबद्दलची माहिती दिली. या बैठकीत पाकिस्तान प्रतीउत्तरात काय कारवाई करू शकते,याबाबत देखील चर्चा झाली असल्याचे कळते. दरम्यान, विदेश सचिव विजय गोखले हे सकाळी साडेअकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन या हल्ल्याबाबत अधिकृत माहिती देणार आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound