धुळे (प्रातिनिधी) जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या (शनिवार) होणारा धुळे जिल्हा दौरा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतू ही शक्यता खोटी ठरवत पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळ्यात येत भूमिपूजन सोहळ्याला हजेरी लावून सभेला संबोधित करणारच आहेत.
भारतीय सैन्य दल यासाठी सक्षम असल्याचे संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ना.नितीन गडकरी आदी मान्यवर उद्या (ता.16) दुपारी 1 वाजता नियोजित कार्यक्रमानुसार धुळ्याला येतील. त्यांच्या हस्ते मनमाड-धुळे-इंदौर रेल्वेमार्ग, सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजना, अक्कलपाडा धरण ते धुळे शहर पाईपलाईन योजनांचे भूमिपूजन आणि विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येईल, तसेच नियोजित जाहिर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधीत करतील असेही डॉ. सुभाष भामरे यांनी कळविले आहे.