Home Cities जळगाव शहरात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्याने जल्लोष

शहरात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्याने जल्लोष

0
22

WhatsApp Image 2019 05 30 at 8.25.03 PM

(प्रतिनिधी) पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हे पुन्हा विराजमान झाल्याने आज भाजप व शिवसेनेतर्फे जल्लोष करण्यात आला. तेली समाजातर्फे पेढे वाटप करण्यात आले.

 

आज नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे पंतप्रधान पदाची शपथ घेतली. भाजपा व मित्रपक्षाचें सरकार केंद्रात सत्तेवर आल्याने भाजपा कार्यालयाबाहेर फटाके फोडून आतिषबाजी करण्यात आली. याप्रसंगी महापौर सीमा भोळे, भागत बालाणी, उज्ज्वला बेंडाळे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, बंडूदादा काळे, अस्मिता पाटील, किशोर चौधरी आदी उपस्थित होते. दरम्यान, जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ व तेली समाज युवक मंडळातर्फे फाटख्यांची आतिषबाजी व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यासोबतच महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे प्रदेशाध्यक्ष रामदास तडस हे खासदार झाल्याने आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी आर. टी. चौधरी, महेश चौधरी, देवेंद्र गांगुर्डे, मनोज चौधरी, पांडुरंग चौधरी, कैलास चौधरी, एकनाथ चौधरी, दुर्गेश चौधरी, उदय चौधरी, रवींद्र चौधरी, सुनील चौधरी आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound