Home Cities जळगाव पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी ना. महाजनांकडून जागेची पाहणी

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी ना. महाजनांकडून जागेची पाहणी


 

63ce758f e850 4846 89ef d3cbb8a6e27d
 

जळगाव (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 13 तारखेला जळगाव शहरात भव्य जाहीर सभा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आज सायंकाळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील एकलव्य क्रिडा संकुलाची पाहणी केली.

 

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहिती नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (ता.13) जळगाव जिल्ह्यात येणार असून जळगाव शहरात त्यांची जाहीर सभा होईल. अद्याप सभेचे ठिकाण निश्चित नसले तरी दोन-तीन दिवसांत ते निश्चित करुन सभेचे नियोजन करण्यात येणार आहे. यानुसार आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले,, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. दरम्यान, उद्या सकाळी आणखी अन्य काही मैदानांची देखील पाहणी होणार आहे.


Protected Content

Play sound