पोस्टर्स झळकावून महिलेने मोदींना विचारले शेतकऱ्यांंना अच्छे दिन केव्हा ?

WhatsApp Image 2019 04 12 at 12.38.18 PM

अहमदनगर (वृत्तसंस्था ) अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी प्रचारसभा झाली. ही सभा एका महिलेने झळकावलेल्या पोस्टर्सची सध्या जोरदार चार्चेत आली आहे. ‘शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार?  शेतमालाला हमीभाव कधी मिळणार?’ असे प्रश्न ज्वलंत प्रश्न विचारणारे पोस्टर्स या महिलेने सभेत झळकावले आहेत.

 

दरम्यान, मोदींच्या या सभेत काळे कपडे घालून आलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यात आला नाही.  तसंच सभेसाठी आलेल्या काही लोकांना काळ्या रंगाचं बनियान घातलं असल्यास ते उरवण्यास सांगितलं गेलं. याबाबत ‘आज तक’ने वृत्त दिलं आहे. युतीचे उमेदवार डॅा. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी इथं सभा घेणार आहेत. पण या सभेवेळी काळ्या रंगाचं कापड अंगावर असल्या कारणाने अनेक लोकांना प्रवेश दिला जात नसल्याचं समोर आलं आहे.

Add Comment

Protected Content