Home राजकीय पंतप्रधान मोदी दहशतवाद्यांसारखेच, विजया शांती यांचे वादग्रस्त वक्तव्य

पंतप्रधान मोदी दहशतवाद्यांसारखेच, विजया शांती यांचे वादग्रस्त वक्तव्य


pm modi reuters 1

हैदराबाद (वृत्तसंस्था) काँग्रेस नेत्या व अभिनेत्री विजयाशांती यांनी पंतप्रधान मोदींवर जहरी टीका करताना ते दहशतवाद्यासारखे दिसत असल्याचे बेताल वक्तव्य केले आहे. देशाला मोदींची भीती वाटते, तसेच सगळ्या जनतेला ते घाबरवत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. शनिवारी (9 मार्च) तेलंगणात कॉंग्रेसच्या एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी अकलेचे तारे तोडत हे वादग्रस्त विधान केले.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एखाद्या दहशतवाद्यासारखे दिसतात. कधी ते आपल्यावर कोणता बॉम्ब टाकतील याची सतत भीती मनात वाटते. त्यामुळे मोदींना सगळेच लोक घाबरतात. जनतेवर प्रेम करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला घाबरवत आहेत. देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या माणसाने कसं नसावं, याचं उदाहरण पंतप्रधान मोदी आहेत’ असं ही त्या म्हणाल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound