पंतप्रधान मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर

PMNarendraModi

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) यूएईपाठोपाठ रशियानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे. भारत आणि रशियातील धोरणात्मक भागीदारी वाढवण्यात मोदींनी मोठी कामगिरी बजावल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे रशियाच्या दूतावासाकडून सांगण्यात आले आहे.
मोदींना रशियाने ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्रयू द एपोस्टल’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे.

 

रशियाचा हा सर्वोच्च पुरस्कार असून १६९८ पासून हा पुरस्कार दिला जातोय. सोव्हियत शासनाच्या काळात हा पुरस्कार देणे बंद करण्यात आले होते. मात्र १९९८ पासून पुन्हा हा पुरस्कार देण्यात येत आहे. १९९८ नंतर विदेशातील राष्ट्रप्रमुख आणि राष्ट्राध्यक्षांनाच हा पुरस्कार देण्यात येतोय. ४ एप्रिल रोजी मोदींना यूएईने सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवलं होतं. दोन्ही देशातील संबंध मजबूत करण्यात मोदींनी अभूतपूर्व कामगिरी बजावल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं यूएईने म्हटलं होतं. त्याआधी दक्षिण कोरिया, सौदी अरब, आणि यूएनने मोदींना पुरस्कार देऊन गौरवलं आहे.

Add Comment

Protected Content