Home धर्म-समाज पंतप्रधान मोदींना ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्कार प्रदान

पंतप्रधान मोदींना ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्कार प्रदान

0
28

modi

 

न्यूयॉर्क वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात स्वच्छता अभियानाचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशनचा प्रतिष्ठित ग्लोबल गोलकिपर्स पुरस्कार प्रदान करण्यात आला. फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्या कोणत्याही देशातून अशा अभियानाबाबत ऐकायला किंवा पाहायला मिळालेले नाही. या अभियानाचा सर्वाधिक फायदा हा देशातील गरीब, देशातील महिलांना झाला आहे. भारतातील स्वच्छते बाबतचे आपले अनुभव आणि आपले वैशिष्ट्य जगातील इतर देशांबरोबर सामायिक करण्यास तयार आहे. भारत २०२२ पर्यंत प्लास्टिक मुक्त अभियानही चालवणार असल्याची माहिती मोदींन दिली. स्वच्छ भारतसारखे अनेक अभियान देशात सुरू आहेत आणि तेही यशस्वी होतील असा मला विश्वास आहे, असे ही मोदींनी यावेळी सांगितले.


Protected Content

Play sound