चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील ‘रहा अपडेट’ व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून आज (दि.७) शहरात विविध ठिकाणी ११० वृक्षांचे रोपण करण्यात आले. येथील शहर पोलीस स्टेशनच्या मैदानावर ६० झाडे व ६० ट्री गार्ड लावण्यात आले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते उदय पवार यांच्या निवासस्थानी आठ झाडे लावण्यात आली. भुषण मंगल कार्यालयाचे संचालक पंकज साळुंखे यांच्या मंगल कार्यलयाजवळ १५ झाडे, हिरापूर रोडवर असलेल्या शिव सिदाजी मंदिर परिसरात १२ झाडे, रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार यांच्या पवारवाडी परिसरात १२ झाडे आणि हिरापूर रोडवरील सिव्हिल इंजिनियर मोहन देशमुख यांच्याकडे तीन झाडे असे एकूण ११० झाडे लावण्यात आली.
या मोहिमेत पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड न.पा. चे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, ‘ट्री गार्ड’ चे दातृत्व ज्यांनी केले, ते युवा उद्योजक वर्धमान धाडीवाल, दिलीप घोरपडे, राकेश नेवे, उदय पवार, पंकज साळुंखे, खुशाल पाटील, राजेंद्र मांडे, मुराद पटेल, कुणाल कुमावत, शरद पाटील, गणेश गवळी, शिवकुमार देवरे, तुषार देवरे, बबन पवार, गणेश पवार, गोपनीय पोलीस गणेश पाटील, पंढरीनाथ पवार, संभाजी पाटील, संदीप पाटील, काशिनाथ गवळी, सुप्पाजी पिरणाईक, संदीप उदिकर, सचिन आव्हाड, संभाजी घुले, किशोर झरखनडे, गोटू टेलर, नारायण देवर्षी, वाल्मिक पिरणाईक व गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वर्धमान धाडीवाल यांनी खड्डे करण्याचे मशीन सोबत आणून स्वतः खड्डे करून वृक्षारोपण केले व ज्यांच्याकडे वृक्षारोपण केले त्यांना या झाडांच्या संवर्धनाची जवाबदारी देण्यात आली आहे.