Home Cities रावेर शिरसाळा येथील मारोती मंदीरात महामंडलेश्वरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण

शिरसाळा येथील मारोती मंदीरात महामंडलेश्वरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारोती मंदीरात महामंडलेश्वर राधेबाबा व महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी ३० जुलै रोजी इंदौर येथील आदरणीय प.पू महामंडलेश्वर श्री श्री १००८ राधे राधे बाबा राष्ट्रीय संयुक्त महामंत्री अखिल भारतीय संत समिती इंदौर व फैजपूर येथील आदरणीय प.पू सतपंथरत्न १००८ महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज कोषाध्यक्ष अखिल भारतीय संत समिती संतकृपा आश्रम फैजपूर यांनी शिरसाळे मारोती देवदर्शनासाठी सदिच्छा भेट दिली त्या प्रसंगी त्यांचे शुभहस्ते मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले त्यांचा जय श्री हनुमान मंदिर ट्रस्ट शिरसाळे मारोती ट्रस्टतर्फे श्री विश्वनाथ मारोती पाटील अध्यक्ष जय श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, उपाध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ कर्मचारी यांच्या वतीने शाल हार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


Protected Content

Play sound