यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील सकल हिन्दु समाजाच्या वतीने बांगलादेशामध्ये होत असलेल्या अल्पसंख्यांक हिंदू व दलित यांच्या होत असलेल्या हत्येच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या माध्यमातुन जळगाव जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदच्या आवाहानास सर्व जाती धर्माचे व्यावसायिक व नागरिकांच्या वतीने मोठा पाठींबा मिळाला असून यावल शहरासह तालुक्यात सर्वत्र कडकडीत बंद पाडला जात आहे.
दरम्यान यावल शहरात काही नवीन उपक्रम म्हणून “एक दिवस महाराजांसाठी या समाजसेवी प्रतिष्ठान व सकल हिंदू समाजच्या पुढाकाराने बांगलादेशमध्ये झालेल्या अत्याचारात मरण पावलेल्या अल्पसंख्यांक हिंदू व दलित यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली वाहण्यासाठी यावल शहरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आले. यावल शहरातील नगर परिषदच्या साठवण तलावच्या आवारात २५० विविध जातीची झाडे लावण्यात आले व हिंसाचारात मरण पावलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी यावल शहरातील तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व यावल पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या या कार्यक्रमाच्या उपस्थितीने सर्वांचे मनोबल वाढवले. सदर वृक्षारोपणाचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान यावल सोबत सकल हिंदू समाज यांच्यासह यावल नगरपरिषदचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.