धरणगाव (वार्ताहर) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलच्या आवारात आज वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सध्या निसर्गाचे ढासळत चाललेले संतुलन , जमिनीची धूप , पावसाची अनिश्चितता या सर्व गोष्टींना वृक्षांची तोड कारणीभूत आहे.यावर उपाय म्हणून आपण वृक्षारोपण व त्यासोबतच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी पार पडली पाहिजे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक श्री. मोरे यांनी केले. आजच्या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकवर्गाने प्रत्येकी दोन झाडे जगविण्याचा संकल्प केला. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे , शाखा व्यवस्थापक जगन गावित व सुनिल चौधरी यांच्यासह सर्व शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.