महापालिकेत लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला माल्यार्पण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या आवारातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला आमदार राजूमामा भोळे आणि आयुक्त डॉ. विद्या गायकवाडा यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

जळगाव शहरातील महापालिका आवारात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी ३१ ऑक्टाबर रोजी सकाळी ११ वाजता अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे आमदार राजूमामा भोळे, महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याहस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांची सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्यालया उजाळा देण्यात आला. याप्रसंगी राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

Protected Content