जळगाव प्रतिनिधी : पिंप्राळ्यातील विठ्ठल मंदिर संस्थान आणि वाणी पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४४ वर्षांची परंपरा असलेला पिंप्राळा रथोत्सव शुक्रवार दि. १२ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त साजरा होत आहे. प्रतीपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंप्राळा रथोत्सवाची तयारी पूर्णत्वास आली आहे. भजनी मंडळ देखील सराव करण्यात मग्न झाले आहेत.
या रथोत्सवाची सुरुवात सकाळी ५ वाजता योगेश गोविंदा वाणी यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात येईल. यंदा रथाच्या महापूजेचा मान शामकांत ओंकार वाणी यांना मिळालेला असून त्यांच्या हस्ते सपत्नीक ११.३० वाजता महापूजा केली जाईल. दुपारी १२.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, महापौर सीमा भोळे आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे,उपमहापौर आश्विनभाऊ सोनावणे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
रथाचा मार्ग
रथाला पिंप्राळ्यातील चावडीपासून सुरुवात होऊन रथ कुंभारवाडा, मढी चौक, धनगर वाडा, मशिद, गांधी चौक, मारूती मंदिरमार्गे रात्री साडेआठला पिंप्राळ्यातील चावडीजवळ येईल. या रथ मोह्त्सवात प्रयास मित्रमंडळ लेझिम पथकाचाही समावेश असणार आहे.