Home Cities जळगाव कुलभूषण पाटील यांच्या नेतृत्वावर पिंप्राळेकरांचा ठाम विश्वास

कुलभूषण पाटील यांच्या नेतृत्वावर पिंप्राळेकरांचा ठाम विश्वास


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात राजकीय वातावरण तापले असले तरी विकासाच्या मुद्द्यावर नागरिकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रभाग क्रमांक ८ आणि १० मध्ये गेल्या कार्यकाळात करण्यात आलेल्या ठोस विकासकामांमुळे कुलभूषण पाटील यांच्या नेतृत्वावर पिंप्राळेकरांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे.

प्रभाग क्रमांक ८ आणि १० मध्ये रस्ते काँक्रीटीकरण, गटार व ड्रेनेज व्यवस्था सुधारणा, पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स, स्वच्छता व्यवस्था, स्ट्रीट लाईट्स तसेच नागरी मूलभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागल्याने परिसराचा चेहरामोहरा बदलला असून नागरिकांना थेट दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.

लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलताना पिंप्राळा परिसरातील नागरिकांनी सांगितले की, कुलभूषण पाटील यांनी नेहमीच लोकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. छोट्या गल्ल्यांपासून मुख्य रस्त्यांपर्यंत विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. कामांची गुणवत्ता आणि सातत्य यामुळेच आज परिसरात विकासाचा ठसा स्पष्टपणे दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर पिंप्राळा परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मजबूत उमेदवारांची फळी उभी केली आहे. प्रभाग क्रमांक ८ मधून ८ अ – उज्वला कुलभूषण पाटील, ८ ब – शोभा रविंद्र सोनवणे, ८ क – कापसे मयूर चंद्रकांत आणि ८ ड – पुनमचंद सुपडू पाटील हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर प्रभाग क्रमांक १० मधून १० अ – निकम कौशल्याबाई उत्तम, १० ब – पुष्पा विठ्ठल चौधरी, १० क – शेख हसीना बी शरिफ आणि १० ड – कुलभूषण वीरभान पाटील हे उमेदवार मतदारांच्या दारात विकासाचा अजेंडा घेऊन पोहोचत आहेत.

स्थानिक विकास, विश्वासार्ह नेतृत्व आणि संघटित पॅनल यामुळे आगामी निवडणुकीत कुलभूषण पाटील आपल्या संपूर्ण पॅनलसह पुन्हा एकदा नगरसेवकपदी निवडून येतील, असा ठाम विश्वास पिंप्राळा परिसरातील मतदार व्यक्त करत आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीतही येथे विकास हाच प्रमुख मुद्दा ठरत असल्याचे चित्र आहे.


Protected Content

Play sound