पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळकोठा येथे यात्रेदरम्यान पूर्व वैमण्यसातून आरोपी जगदीश पाटील, तुषार प्रदीप कदम व इतर साथीदारांनी भांडण सोडवण्यास गेलेले चेनेश्वर पाटील यांच्या पोटात गावठी कट्ट्याने गोळी मारत फरार झाले होते. यातील बाळा उर्फ तुषार यास पकडण्यासाठी सर्व पथकाने सापळा रचित त्यास ताब्यात घेतले.
याप्रकरणी पारोळा पोलीसात बाळा उर्फ तुषार प्रदिप कदम (वय-19) रा.नवलनगर याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासुन या गुन्हयातील आरोपी तुषार कदम हा फरार होता. पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित धुळे शहरात फिरत असल्याचे पोलीसांना समजले. त्यानुसार पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अमळनेरचे उपविभागीय पो.अधिकारी सचिन गोरे, पो.नि. लिलाधर कानडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पो.स्टे.चे पोहेका रविंद्र रावते, पो.कॉ. सुनिल साळुखे, पो.कॉ.पंकज राठोड, किशोर भोई दिपक अहीरे अश्यांनी लागलीच संशयितास ताब्यात घेतले. गुन्हयाचा तपास पो.निरीक्षीक लिलाधर कानडे करीत आहे.