विघ्नहर्तातर्फे पिंपळगाव हरे. येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर (व्हिडीओ)

shibir

 

 

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील व परिसरात अद्ययावत सुविधांनी असे सुजज्ज विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या माध्यमातून तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे भव्य रोग निदान शिबिराचे अयोजन आज 13 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.

या शिबिरात सेवा देण्यासाठी विघ्नहर्ता मल्टिप्लेक्स हॉस्पीटलचे डॉ. भूषण मगर, हृदयरोग तज्ञ डॉ.एम स्वामी, डॉ. सागर गरुड, डॉ.विश्वेश रोटे, बालरोगतज्ञ डॉ. राहुल पटवारी, डॉ. सदीप इंगळे, डॉ.प्रीती मगर, स्री रोगतज्ञ डॉ.अनुजा देशमुख, अस्थी रोगतज्ञ डॉ.प्रवीण देशमुख आदी उपस्थित होते. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून सर्व प्रकारच्या आजारांवर मोफत तपासणी व औषधोपचार केले.

शासकीय योजना उपलब्ध
विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेस शासनाकडुन मान्यता मिळाली असून मोठमोठे ऑपरेशनसाठी ग्रामिण भागात व पाचोऱ्यात आरोग्य सुविधेसाठी गोर – गरीब रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या योजनेस सुरवात झाली असून आरोग्यासाठी जास्त खर्च लागतो, अशी भीती मनातून काढून टाका आणि आरोग्यकडे काळजीपूर्वक लक्ष द्या असा सल्ला डॉ. भूषण मगर यांनी रुग्णांना दिला.

या शिबिरात पिपळगाव हरेश्वर या ग्रामीण भागातील वरसाडे तांडा भोजे चीचपुरे सावखेडा इतर गावांतील हजार ते बाराशे रुग्णाची तपासणी करण्यात आली. शिबीरात रक्त लघवी तपासणी ई.सी.जी .डोयबीटीस शुगर, रक्तदाब अश्या विविध तपासण्या मोफत करण्यात आले. व सर्दी, ताप, खोकला, अंग दुखणे, गुडघे दुखणे, संधिवात, मान दुखी, कबर, तायफाईड तसेच स्त्री यांना होणारे विविध आजार, वयोवृध्दांना योग्य मार्गदर्शन देऊन मोफत औषधोपचार करण्यात आले. या शिबिर यशस्वितेसाठी पिंपळगाव हरेश्वर ग्रामपंचायत मंडळ ग्रामस्थ व सर्व राजकीय पदाधिकारी, सामाजिक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले. गावकऱ्यांच्या एकजुटीने आरोग्य शिबीर यशस्वीपणे संपन्न झाले.

Protected Content