मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी। संपुर्ण जगाचे लक्ष लागून असलेले ‘चांद्रयान 3’चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अखेर यशस्वीरीत्या चंद्रावर उतरले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) च्या शास्त्रज्ञांनी हि मोहिम यशस्वी करून संपुर्ण जगतात भारत देशाचे नाव उंचावले आहे.
यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविण्या बाबतीत भारत प्रथम राष्ट्र ठरले आहे.-भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या म्हणजेच इस्त्रोच्या शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांच्या अपार मेहनतीचे चिज झाले असुन या मोहिमेमुळे संपुर्ण भारतीयांची छाती गर्वाने फुगली आहे.
चांद्रयान 3 या मोहिमेविषयी संपुर्ण माहिती देणाऱ्या चित्र प्रदर्शनीचे जे ई स्कुल आणि ज्युनियर कॉलेज मुक्ताईनगर येथे आयोजन करण्यात आले आहे.
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन रोहिणी ताई खडसे खेवलकर यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उप प्राचार्य जे.जे पाटील, पर्यवेक्षक व्ही डि बऱ्हाटे, एस पि राठोड, एस आर महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी रोहिणी खडसे खेवलकर म्हणाल्या चांद्रयान 3 हे यशस्वी रित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथमच एखाद्या देशाचे यान उतरल्याने संपुर्ण जगाचे या मोहिमेने लक्ष वेधुन घेतले आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ने हि ऐतिहासिक कामगिरी पुर्ण करत संपुर्ण भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथमच एखाद्या देशाचे यान उतरल्याने संपुर्ण जगाचे या मोहिमेने लक्ष वेधुन घेतले आहे भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ने हि ऐतिहासिक कामगिरी पुर्ण करत संपुर्ण भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.’चांद्रयान 3′ हे चंद्रावर उतरून तेथील भौगोलिक व इतर परिस्थितीचा अभ्यास करणार आहे चंद्राची रचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रासायनिक आणि नैसर्गिक घटक, माती, पाणी इत्यादींवर वैज्ञानिक प्रयोग करणारे इन-साइट वैज्ञानिक निरीक्षण मिळवणार आहे याचा भविष्यात आपल्याला संशोधन व इतर बाबींसाठी फायदा होइल या मोहिमेचा आपल्या सर्वांना अभिमान असायला हवा असे त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांनी सर्व महिती व्यवस्थित समजुन घ्यावी संशोधक वृत्ती जोपासून प्रेरणा घ्यावी असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले
या प्रदर्शना मध्ये चांद्रयान 3 च्या निर्मिती पासुन लँडिंग पर्यंत, तसेच भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ने आतापर्यंत केलेल्या इतर अवकाश संशोधन मोहिम, इस्रोची मुहूर्तमेढ रोवणारे डॉ. विक्रम सारा भाई, माजी राष्ट्रपती डॉ ए .पि .जे अब्दुल कलाम सर व इतर भारतीय शास्त्रज्ञां विषयी आणि भारतीय संशोधन संस्था विषयी माहिती देणारे महिती पत्रकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे
यावेळी सी.डी पाटील, डी.एन.खडसे.अजय खुळे, व्ही .बी राणे, व्ही.डि .पाटील , बि एम कोल्हे,कपिल जंगले , एस आर ठाकूर , एस एम वाढे, सौ. ए.पी पाटील,एल.व्ही.पाटील. व्ही एस.राणे, सी.टी.पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ए. पी.झांबरे यांनी तर आभारप्रदर्शन सी. डी.पाटील यांनी केले.