अवैधपणे गुरांची वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले; ५ बैलांची सुटका

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळ अवैधपणे गुरांची वाहतूक करणारे पिकअप वाहन मुक्ताईनगर पोलिसांनी पकडले आहे. यामध्ये ५ बैलांची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळ अवैधपणे पिकप वाहनांमधून गुरांची वाहतूक होत असल्याचे गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवारी १२ जून रोजी पहाटे ५ वाजता ही कारवाई केली. दरम्यान या वाहनातून ५ बैलांची सुटका करण्यात आली आहे. याबाबत विचारणा केले असता चालकाकडे वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. दरम्यान यांची दाटीवाटीने व चारापाण्याची कुठलीही सोय न करता यांची वाहतूक होत असल्याने याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक चौकशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक विजय पठार करीत आहे.

Protected Content