जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महिलेवर अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपांनंतर पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी याबाबतचे आदेश पारित केले आहेत.

एलसीबी प्रमुख पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी नियोजन समितीच्या बैठकीत आरोप केले होते. यानंतंर लागलीच एका महिलेने तक्रार दाखल केली होती. नंतर त्या महिलेने घुमजाव करत पुढे पाठपुरावा केला नाही. तथापि या तक्रारीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली होती. चौकशीअंती पाटील यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काळ सायंकाळी याबाबतचे आदेश पारित केले आहेत.

या घटनेमुळे जिल्हा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि विश्वास अबाधित ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.



