अमळनेर प्रतिनिधी । मारवाड विकास मंचाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासणारे पोलीस निरिक्षक गिरीश पाटील यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.
मूळचे मारवड येथील पोलीस निरिक्षक गिरीश भास्करराव पाटील (वय ५२) यांच्यावर गत आठवड्यापासून उपचार सुरू होते. डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करत असताना अचानक त्यांची प्राणज्योत मावळली. ही बातमी वार्यासारखी सोशल मीडियावर आल्याने मित्र परिवारांना गिरीश पाटलांच्या जाण्याने मोठे दुःख झाले. गिरीश पाटील यांची नुकतीच नाशिक येथे त्यांची पीआय म्हणून बदली झाली होती. त्यांनी मारवाड विकास मंच माध्यमातून सामाजिक कामावर मध्ये व शैक्षणिक कामात त्यांनी मोठे योगदान दिले होते. मराठी साहित्य संमेलन यातही त्यांचा मोठा सहभाग होता .समाजातील तळागाळातल्या अनेक उपेक्षित लोकांना न्याय देण्याचं काम गिरीश पाटील यांनी केले होते. त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक मित्र परिवारांचा मोठा गोतावळा होता. त्यांच्यावर उपचार व्हावे यासाठी संदीपकुमार साळुंखे व त्यांच्या मित्र परिवारांनी शर्तीचे प्रयत्न केले पण शेवटी अपयश आले त्यांच्या अचानक जाण्याने परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे आई पत्नी एक मुलगा एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज मारवाड गावातील राहत्या घरून चार वाजता निघणार आहे.