पाच लाखांसाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील माहेर असलेल्या विवाहितेला ५ लाखांची मागणी करत सासरी भुसावळ येथे मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात शनिवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासर मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील माहेर असलेल्या कांचन केतन वानखेडे वय-३० यांचा विवाह भुसावळ येथील केतन भागवत वानखेडे यांच्याशी फेब्रुवारी-२०२१ मध्ये रीतीरीवाजा नुसार झालेला आहे. दरम्यान विवाहितेला माहेराहून ५ लाख रुपये आणावे, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान आई-वडिलांची परिस्थिती हालाखीची असल्या कारणामुळे विवाहितेने पैसे आणले नाही. याचा राग येऊन पती केतन वानखेडे याने शिवीगाळ व मारहाण करून दमदाटी केली, तसेच सासू, सासरे, जेठ यांनी देखील पैशांसाठी शारीरिक व मानसिक छळ केला. सासरच्या मंडळींकडून छळ सहन न झाल्याने विवाहित माहेरी निघून आल्या.

त्यानंतर त्यांनी शनिवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात १० घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पती केतन भागवत वानखेडे, सासरे भागवत सदू वानखेडे, सासू अरुणा भागवत वानखेडे, जेठ रवींद्र भागवत वानखेडे आणि जीवन भागवत वानखेडे सर्व रा. भुसावळ यांच्यावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे करीत आहे.

Protected Content