खेळामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन उच्चप्रतीचे- पोलीस निरीक्षक वानखेडे

WhatsApp Image 2019 10 06 at 2.20.23 PM

फैजपूर, प्रतिनिधी | सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात मोबाईलच्या वेडापायी तरुण पिढी मैदानी खेळाकडे वळत नसून शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खचत चालली आहे. छोट्या छोट्या अपयशाला पचवणे तरुणांना अवघड जाते. यावर सर्वोत्तम उपाय म्हणून खेळाच्या माध्यमातून तरुणांमध्ये शारीरिक मेहनत आणि प्रयत्नांची पराकाष्टा करून यश साध्य करण्याची उमेद जागृत करण्याची सुवर्णसंधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे असे मत पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी व्यक्त केले.

ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, अंतर्गत जळगाव विभागीय आंतरमहाविद्यालयीन भारतोलन व शक्तीतोलन ( पुरुष महिला ) व शरीरसौष्ठव ( पुरुष) स्पर्धा च्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. पी. आर. चौधरी हे होते. प्रास्ताविक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ जी एस मारतळे यांनी केले. या स्पर्धेसाठी जळगाव क्रीडा विभागाचे सचिव पी. आर. चौधरी (पी आर नाना) भोळे महाविद्यालय, भुसावळ येथील प्रा संजय चौधरी, संत मुक्ताबाई महाविद्यालय मुक्ताईनगर, येथील प्रा. वीरेंद्र जाधव, भालोद महाविद्यालयाचे प्रा मुकेश पवार, रावेर येथील प्रा. उमेश पाटील, प्रा. जाधव, प्रा. पंकज पाटील, मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्रा. अंकुश चौधरी, गव्हर्नर्मेंट इंजिनीअरिंग जळगाव येथील प्राध्यापक सानप , निवड समिती सदस्य , तांत्रिक समिती सदस्य, संघ मार्गदर्शक ,पंच आदी उपस्थित होते.या  स्पर्धांना राष्ट्रीय पंच योगेश महाजन यांचीही उपस्थिती लाभणार आहे. यावेळी तुषार सपकाळे, प्रशिक्षक, प्रशांत कोळी, अभिषेक महाजन या उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. उद्घाटन पर भाषणात प्रकाश वानखेडे यांनी खेळांच्या माध्यमातून पोलीस विभागात विविध सेवांमध्ये प्राधान्य असल्याने तरुणांना खेळाच्या माध्यमातून पोलिस दलात कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले. याकामी फैजपूर पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचारी सदैव मार्गदर्शन आणि सहकार्य देतील असे आश्वासन दिले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. पी. आर. चौधरी यांनी खेळाडूंनी प्रयत्नांची पराकाष्टा करून यश साध्य करावे. अथक प्रयत्नातून यश निश्चितच मिळते याचा उत्कृष्ट उदाहरण धनाजी नाना महाविद्यालय असून विद्यापीठ परिक्षेत्रात अग्रगण्य महाविद्यालयांपैकी एक असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. जी. एस. मारताळे यांनी केले. यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी नितीन सपकाळे, राजेंद्र ठाकूर, युवराज गाढे, तुषार सपकाळे, प्रशांत कोळी, प्रेरणा सोनवणे, आरती सुरवाडे, भूषण तायडे, शुभम मोरे, तुषार मोरे यांनी सहकार्य केले.

Protected Content