जळगाव (प्रतिनिधी) येथील खान्देश माळी महासंघ व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे तर्फे तथा क्रांतीज्योती बहुउद्देशीय संस्थेतर्फे महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त पर्यावरण पूरक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यापर्यावरण पूरक कार्यक्रमातून पक्षी बचाव अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत १०० मातीच्या परळ वाटत करण्यात आले. पाणी आडवा पाणी जिरवा , स्त्रीभ्रूणहत्या थांबवा, झाडे लावा झाडे जगवाचे, पोस्टर वाटप करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महापौर सीमा भोळे, महापालिका आयुक्त डॉ. उदय टेकाडे, खान्देश माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर महाजन, संतोष इंगळे, प्रकाश महाजन, गजानन महाजन, सिंधु कोल्हे, सरिता नेरकर, शुभांगी बिऱ्हाडे, सरिता माळी, सुरेश सोनवणे, प्रतिभा शिंदे, अरुण चौधरी, सुनील माळी, विक्की माळी , शहर अभियंता सुनील भोळे, मुकूंद सोनवणे, बन्सीअप्पा माळी, कृष्णा माळी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खान्देश माळी महासंघ सरचिटणीस वसंत पाटील यांनी यावेळी दुष्काळ परिस्थिती असल्याने हा खर्च पर्यावरण संरक्षण करण्यासाठी व पक्ष्यांच्या साठी मातीची परळ घेऊन एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी गजानन महाजन यांनी मातीच्या परळ उपलब्ध करून दिल्या. यावेळी महिला उत्सव समितीच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते. वसंत पाटील, सुनिल माळी, विक्की माळी, जयेश माळी आदीनी परिश्रम घेतले. यावेळेस माळी समाज व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.