पहूर, ता.जामनेर (वार्ताहर)। पहूर येथे महात्मा बसवेश्वर व भगवान परशुराम महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. येथील पहूर पेठ ग्रामपंचायत हाॅल मध्ये आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच निताताई पाटील हे होते. यावेळी माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, मनोज जोशी, शरद बेलपत्रे, मधुकर पांढरे सर, अॅड. संजय पाटील, गावंडे सर, माजी. जि.प.कृषी सभापती प्रदीप लोढा, बाबूराव घोंगडे, रामेश्वर पाटील, माजी पो.पा.विश्वनाथ वानखेडे, यांनी महात्मा बसवेश्वर महाराज व भगवान परशुराम महाराज यांच्या जिवनावर प्रकाशझोत टाकून मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपसरपंच रवींद्र मोरे, भारती सुभाष जोशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, साहेबराव देशमुख, रोहयो तालुकाध्यक्ष समाधान पाटील, प्रशांत जोशी, सलीम शेख, दिपक भट, ललीत लोढा, मोहन जोशी, मुन्ना पठाण, किरण जोशी, बापु सोनार, योगेश जोशी, राकेश भट, बापु पांढरे, रमेश माहोरे, राहूल घरोटे, सुभाष बेलपत्रे, अक्षय माहोरे, वैभव लाठे, ज्ञानेश्वर पांढरे, रवींद्र घोलप, गजानन कुयटे , मनोज लाठे, निळकंठ बेलपत्रे, चेतन रोकडे, गौरव लाठे, सुधिर गुरव, रमेश बनकर, किरण भट आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार शांताराम लाठे तसेच तर सुत्रसंचालन शंकर भामेरे यांनी तर आभार रविंद्र लाठे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत पहूर पेठ चे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
बघा । उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मान्यवर